हॅलो ! नमस्कार !
मी प्रेरणा चांदवणकर
कर्णबधिर मुलांना शिकवण्याचे बत्तीस वर्ष काम करून मी 2014 साली सेवानिवृत्त झाले . पहिली ४ वर्ष अस्तित्व मूक बधिर प्रबोधिनी - डोंबिवली येथे तर नंतरची २७ वर्ष दादर येथील जानकीबाई शिक्षण संस्थेच्या कर्णबधिर मुलांसाठी विकास विद्यालय येथे काम केले . पहिल्यापासून मी शिशू वर्गांना शिकवत असल्यामुळे त्यांच्यासाठी फारशी पुस्तके उपलब्ध नव्हती . त्यामुळे शिकवताना स्वतःहून वेगवेगळे प्रयोग करता आले . अर्थात यासाठी ज्यांनी आम्हाला कर्णबधिर मुलांना कसे शिकवावे यासाठी मार्गदर्शन केले त्यांच्या अनुभवाचा , शिकवण्याचा खूप फायदा झाला अशा कुंदाताई दळवी, विजूताई भागवत , रोहिणीताई लिमये यांचा मुद्दाम उल्लेख करावयास हवा .
२००० साली शाळेतर्फे आम्हाला संगणकाचे प्रशिक्षण देण्यात आले . त्याबदल थोडी फार माहिती होती पण शाळेत त्याचा काय उपयोग ? हाच दृष्टीकोन होता . प्रशिक्षणा नंतर बरेच दिवस चाचपडल्यावर एकदम ' तिळा तिळा दार उघड ' सारखे झाले . नवीन तंत्रज्ञान, गुगल, पिंटरेस्ट सारख्या वेगवेगळ्या वेबसाईट यांचाही खूप उपयोग झाला . त्यामुळे केलेल्या थोड्याफार कामाचे दस्ताऐवजीकरण करणेही सोपे झाले .
शिकवताना जे थोडेफार फार प्रयत्न केले त्याचे जमेल तसे दस्ताऐवजीकरण करावे व त्याचा कोणास फायदा झाला तर व्हावा यासाठी ते सर्व व एकत्रित करून देण्याचा हा प्रयत्न आहे . मला विश्वास वाटतो की कर्णबधिर व इतर मुलांना त्यांच्या पालकांना व या क्षेत्रात म्हणजे कर्णबधिर मुलांना शिकवण्याच्या क्षेत्रात धडपड करणाऱ्या नवीन शिक्षकांना याचा उपयोग होईल
या वेबसाइट मधील साहित्याचा शैक्षणिक साहित्याचा तुम्ही जरूर उपयोग करा . तुमच्या प्रतिक्रिया कळवा .
काही शंका असल्यास WhatsApp वर संपर्क साधा.
धन्यवाद !
प्रेरणा चांदवणकर
mobile no. 9870420317
chandvankar.prerana@gmail.com