👆🏽 कर्णबधिर मुलांच्या कानात काही दोष असतो . कर्णबधिर मुले ऐकू शकतात. त्यासाठी त्यांना श्रवणयंत्र लावून किंवा ज्यांचे कॉक्लीअर इम्प्लांट झाले आहे त्यांना स्पीच प्रोसेसर लावून योग्य प्रकारे श्रवणप्रशिक्षण शिक्षण कसे द्यावे, श्रवणालेख कसा वाचावा ? , त्यानुसार मुलाला कसे ऐकू येईल ?, श्रवण प्रशिक्षणाचे टप्पे व श्रवण प्रशिक्षणाचे व्यवसाय असे सर्व एकत्र या पुस्तकात दिले आहे . Online व offline शिकवताना याचा उपयोग होईल तसेच श्रवणालेख कसा समजून घ्यावा . मुलाचा श्रवणदोष व त्याला कसे ऐकू येईल हे या पुस्तिकेत दिले आहे.
👆🏽 कर्णबधिर मुलांच्या कानात काही दोष असतो . स्वरयंत्रात नाही. त्यामुळे कर्णबधिर मुलेही बोलू शकतात. त्यासाठी त्यांना श्रवणयंत्र लावून किंवा ज्यांचे कॉक्लीअर इम्प्लांट झाले आहे त्यांना स्पीच प्रोसेसर लावून योग्य प्रकारे श्रवणप्रशिक्षण व वाचाशिक्षण देण्याची गरज असते. त्या दृष्टीने टप्प्याने वाचाशिक्षण कसे द्यावे, हे या पुस्तिकेत दिले आहे.
या पुस्तकात स्वर, मुळाक्षरे व बाराखडी नुसार शब्द आहेत , याचा उपयोग speech (वैयक्तिक वाचा ) घेताना तसेच श्रवण प्रशिक्षण देताना करता येईल.
या पुस्तकात क ते ज्ञ या मुळाक्षरांनी सुरू होणारे मधे असणारे व शेवटी असणारे शब्द आहेत , तसेच तो तो वर्ण जास्तीत जास्त वेळा येईल अशी वाक्यही आहेत. याचा उपयोग अक्षर ओळख त्याचे दृढीकरण , वाचन, speech (वैयक्तिक वाचा ) घेताना तसेच श्रवण प्रशिक्षण देताना करता येईल.