चित्र काढायला मुलांना आवडतं . तसेच शिकवताना आपल्यालाही अनेक वेळा चित्र काढावी लागतात . त्यासाठी काही रेखाचित्र दिली आहेत . त्याचा उपयोग करून मुलांची भाषावाढ कशी करता येईल यासंबधी काही उदाहरणेही दिली आहेत . भरपूर चित्रही आहेत. अर्थात ही सर्व चित्र internet वरून घेतली आहेत .Online व offline शिकवताना याचा उपयोग होईल असे वाटते .
👆🏽 रोजच्या जीवनात आपल्या घरात घडणाऱ्या घटना, आसपास घडणार्या घटना यामागील शास्त्रीय संकल्पना समजाव्यात तसेच त्या संदर्भाने येणारी भाषा ही मुलांना कळावी . या दृष्टीने छोट्या मुलांसाठी या गोष्टी लिहिलेल्या आहेत .
या गोष्टी आम्ही दोघींनी ( म्हणजे मी व माझी मैत्रीण चित्रा वाड) लिहिल्या आहेत . चित्रा ही कर्णबधिर मुलांसाठीच्या कार्यक्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत आहे .
वाचनाने भाषा समृद्ध होते . मुलांना जाणीवपूर्वक वाचनाची सवय लावायला हवी . त्यातून नक्कीच वाचनाची गोडी लागेल . रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आसपास घडणाऱ्या गमतीशीर घटना यावर लहान - मोठे उतारे काही गोष्टी तयार केल्या आहेत . मुलांना नक्कीच आवडतील असा विश्वास वाटतो आहे .