👆🏽 कोणतीही गोष्ट करताना पूर्वनियोजित असेल तर ती गोष्ट उत्तम होते . त्याचप्रमाणे शाळेत मुलांना शिकवतानाही जे शिकवायचे आहे त्याचे नियोजन केले तर शिकवणे उत्तम होते . तसेच मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचते . या पीडीएफ फाईल मध्ये काही पाठाची टाचण दिली आहेत . त्याप्रमाणे शिक्षकांनी शिकवण्यापूर्वी नियोजन करणे अपेक्षित आहे . हे पाठाचे नियोजन माननीय विजूताई भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे .
👆🏽 कोणत्याही केलेल्या कामाचे मूल्यमापन करणे गरजेचे असते . मूल्यमापन केल्यामुळे आपले काम कितपत यशस्वी झाले आहे व काही उरले असेल तर त्यासाठी काय करायला हवे आहे हे समजते . या पीडीएफ फाईल मध्ये मुलांच्या भाषेच्या प्रगतीचे मूल्यमापन करायचे आहे .
यामध्ये आपण वाचन-लेखन, ओष्ठवाचन, श्रवण प्रशिक्षण, व्याकरण याचे मूल्यमापन करणार आहोत .या पीडीएफ फाईल मध्ये या प्रत्येकाचे टप्पे दिलेले आहे ते टप्पे क्रमाक्रमाने पार केल्यावर मुलांची प्रगती निश्चितच होईल .