गणित :
हा विषय बहुतेकांच्या नावडीचा . याचे कारण मला वाटते मूलभूत संकल्पना समजत नाहीत व त्यामुळे विषयच नकोसा वाटतो. १ ते १० अंकाची ओळख व त्याबरोबरच लगेच इतर गणिती संकल्पना समजाव्यात म्हणून या पुस्तिकांमध्ये विविध व्यवसाय, विविध कृती , भरपूर चित्र व भरपूर वर्कशीट दिल्या आहेत. आकारांची ओळख याबरोबरच आपल्या भोवतालचे आकार याची सांगड घातली आहे. याबरोबरच घड्याळ, कॅलेन्डर यावरील व्यवसाय , सुडोकू कोडीही दिली आहेत.
👆🏽 या पुस्तिकेत १ ते १० अंक तसेच त्यावरील विविध व्यवसाय दिले आहेत. व्यवसाय सचित्र असल्याने त्याबाबतच्या संकल्पना स्पष्ट होतील.
👆🏽 या पुस्तिकेत ११ ते २० अंक तसेच त्यावरील विविध व्यवसाय दिले आहेत. व्यवसाय सचित्र असल्याने त्याबाबतच्या संकल्पना स्पष्ट होतील.
👆🏽 या पुस्तिकेत २१ ते ५० अंक तसेच त्यावरील विविध व्यवसाय दिले आहेत.
👆🏽 या पुस्तिकेत ५१ ते १०० अंक तसेच त्यावरील विविध व्यवसाय दिले आहेत.
👆🏽कालमापन पूर्वीपासून म्हणजे जेव्हा आजच्यासारखी साधने उपलब्ध नव्हती तेव्हा कसे केले जात होते? त्यासंबंधीची भाषा व काही youtube वरील लिंकही दिल्या आहेत.
या पुस्तिकेत पाढे कसे तयार करायचे ही संकल्पना स्पष्ट होण्याच्या दृष्टीने व्यवसाय दिले आहेत . एकदा ही संकल्पना समजली की पाढे मुलं तयार करतील . दिलेली चित्र रंगवून पाढे पाठ करतील . असे पाढे पाठ झाले की गुणाकार व भागाकर करणेही सोप्पे होईल . गुणाकार व भागाकार कळावेत . भाषेतील गणित समजावीत यासाठी विविध व्यवसाय दिले आहेत .